पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शिष्टाचारच नाहीत; पाहा व्हिडिओ! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जून 2019

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चुकीच्या कारणांनी चर्चेत आले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीमध्ये इम्रान खान यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. 

बिश्‍केक : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चुकीच्या कारणांनी चर्चेत आले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीमध्ये इम्रान खान यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. 

या बैठकीसाठी विविध देशांचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी हे प्रमुख दाखल होत असताना सभागृहातील सर्व उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान एकटेच त्यांच्या जागी बसून होते. संपूर्ण सभागृहात ते एकटेच बसून असल्याची जाणीव झाल्यानंतर खान उठून उभे राहिले; पण काही सेकंदांमध्येच पुन्हा जागेवर बसले. त्यावेळी सभागृहातील सर्व उपस्थित उभेच होते. 

राजनैतिक शिष्टाचाराचे उल्लंघन करण्याची ही खान यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 14 व्या ओआयसी बैठकीमध्येही त्यांनी शिष्टाचारांचे उल्लंघन केले होते. सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज यांच्याशी द्विपक्षीय चर्चा सुरू असताना इम्रान खान त्यांनी दुभाषाशी संवाद साधला. त्या दुभाषाने हा संवाद भूमिका राजे सलमान बिन अब्दुलअजीज यांना कळविण्यापूर्वीच इम्रान खान तेथून निघून गेले होते. त्यावरून सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील नागरिकांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan PM Imran Khan breaks protocol at SCO summit