अमेरिकेने इम्रान खान यांना दाखवली जागा

वृत्तसंस्था
रविवार, 21 जुलै 2019

पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने इम्रान खान यांना जागा दाखवली असल्याची चर्चाही सर्वत्र सध्या होत आहे.

वॉशिंग्टन: पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. अमेरिकेने इम्रान खान यांना जागा दाखवली असल्याची चर्चाही सर्वत्र सध्या होत आहे.

इम्रान खान कतार एअरवेजच्या विमानानं सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अमेरिकेत पोहोचले. त्यांचा दौरा तीन दिवसांचा असून या कालावधीत ते पाकिस्तानी राजदूताच्या निवासस्थानी वास्तव्यास असतील. कतार एअरवेजच्या विमानातून अमेरिकेत दाखल झालेल्या इम्रान खान यांचा व्हिडीओ पीटीआयनं ट्विट केला आहे. यामध्ये खान एका सामान्य व्यक्तीसारखे विमानातून उतरताना दिसत आहेत. अनेकांनी यावरुन खान यांची खिल्ली उडवली.

खान त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे राजदूत अजद मजीद खान यांच्या शासकीय निवासस्थानी राहतील. विमानतळावर त्यांच्या स्वागताना परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. यावेळी अमेरिकेचे रहिवासी असलेल्या काही पाकिस्तानी लोकांनी त्यांचं स्वागत केलं. खान त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. या भेटीत संरक्षण, व्यापार आणि कर्जाच्या मुद्द्यावर चर्चा होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Pm imran khan Does Not Get Due Welcome At Us Airport