pakistan pm Imran Khan
pakistan pm Imran Khansakal

Video: इम्रान खानकडून भारतीयांचं कौतुक; म्हणाले "हिंदुस्तानी लोक खुद्दार कौम"

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय लोक स्वाभिमानी असल्याचं म्हटलं आहे.
Published on

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केलं आहे. भारतीय हे 'खुद्दार कौम' (अतिशय स्वाभिमानी लोक) आहेत. कोणतीही महासत्ता भारतावर अटी घालू शकत नाही. मी निराश आहे की केवळ आरएसएसच्या विचारसरणीमुळे आणि काश्मीरशी जे केले जात आहे, त्यामुळे आमचे चांगले संबंध नाहीत",असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याने म्हटले आहे. (Pakistan PM Imran Khan has praised Indians.)

"भारत आणि पाकिस्तान सोबत स्वतंत्र झाले. भारताला मी इतरांपेक्षा नीट ओळखतो. तिथं माझे मित्र आहेत. क्रिकेटमुळे मला भारतीयांकडून प्रेम मिळाले . आरएसएस तत्त्वज्ञान आणि काश्मीर प्रश्नामुळे आपले संबंध बिघडले आहेत. भारतीय हे 'खुद्दर क्वाम' (अतिशय स्वाभिमानी लोक) आहेत. कोणतीही महासत्ता भारतावर अटी घालू शकत नाही. कोणतीच सुपरपावर भारताला रोखू शकत नाही. रशियावर एवढे निर्बंध लादले जाऊनही भारताने तेल आयात करण्याचा निर्बंध घेतला, कारण त्यात जनतेचं भले होते. मीपण त्याच पद्धतीने विचार करतोय. मला कुणाच्या विरुद्ध जायचं नाही पण आधी मला 22 कोटी पाकिस्तानी नागरिकांचा विचार करायचा आहे, मग आपण जगाचा विचार करू,"असं इम्रान खान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com