esakal | भारतासोबतच्या विसंवादाबाबत इम्रान खान म्हणतात; RSS ची विचारधारा...
sakal

बोलून बातमी शोधा

भारतासोबतच्या विसंवादाबाबत इम्रान खान म्हणतात; RSS ची विचारधारा...

भारतासोबतच्या विसंवादाबाबत इम्रान खान म्हणतात; RSS ची विचारधारा...

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या उझबेकिस्तानमधील ताश्कंदमध्ये सेंट्रल-साऊथ एशिया कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले आहेत. त्यावेळी त्यांना ANI कडून काही प्रश्न विचारण्यात आले. भारतासोबत संवाद आणि दहशतवाद या दोन गोष्टी एकावेळी हातात हात घालून साध्य होऊ शकतात का? असा प्रश्न खान यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलंय. मात्र, तालिबानचं काय हा प्रश्न विचारल्यावर मात्र, त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे.

हेही वाचा: अफगाणिस्तानच्या संघर्षात भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा मृत्यू

भारतासोबतचा संवाद दहशतवादासोबतच कसा होऊ शकतो, हा प्रश्न भारताच्या वतीने आहे, यावर काय बोलाल? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, भारताला तर आम्ही सांगतच आहोत, की आम्ही कितीवेळ वाटच पाहत आहोत, आमचं म्हणणं हेच आहे की, आपण एक सभ्य देश म्हणून राहुयात... मात्र, करणार काय? ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा जी आडवी आली आहे...

पुढे त्यांना विचारण्यात आलं की, तुमच्यावर हे आरोप होत आहेत की, तुमचा तालिबानवर कंट्रोल नाहीये. याचं काय उत्तर द्याल. मात्र, या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांनी टाळलेलं दिसून आलं.

loading image