भारताला ताकद दाखविली, भारताचे दोन वैमानिक ताब्यात: इम्रान खान

वृत्तसंस्था
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

भारतात निवडणूक असल्याने मला वाटत नव्हते काही कारवाई होईल. पण, तरीही भारताने मंगळवारी हल्ला केला. त्यावेळी आम्ही प्रत्युत्तर दिले नाही, कारण नुकसानीचा अंदाज होता. पण, आज आम्ही भारतीय हद्दीत घुसखोरी करत दाखवून दिले की आम्हीही तुमच्या देशात येऊ शकतो.

इस्लामाबाद : भारतीय हद्दीत घुसून आम्हाला भारताला आमची ताकद दाखवायची होती. भारताची दोन विमाने आम्ही पाडली असून, त्यांचे दोन वैमानिक आमच्या ताब्यात आहेत, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले.

इम्रान खान म्हणाले, ''आम्हाला शांतता हवी आहे. आम्हाला युद्ध नको. आम्ही भारताला चर्चेचे निमंत्रण देतो. आतापर्यंतच्या युद्धाचा शेवट कोणालाच कळालेला नाही. भारताला आम्ही ताकद दाखविली. आम्हाला युद्ध करायचे नाही. तुमच्याजवळ असलेली शस्त्रास्त्रे आमच्याजवळही आहेत. त्यामुळे युद्ध हा पर्याय नसून, एकत्र बसून चर्चा करू. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही भारताला चौकशीसाठी मदत करण्यासाठी हात पुढे केला होता. पाकिस्तानमध्ये दहा वर्षांपासून हजारो लोक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत. त्यामुळे मला माहिती आहे, की हल्ल्यात गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची काय भावना असते. पाकिस्तान भारताला पूर्णपणे मदत करण्यास तयार होता. पाकिस्तान दहशतवाद्यांना कधीच आपली जमीन वापरू देत नाही.''

भारतात निवडणूक असल्याने मला वाटत नव्हते काही कारवाई होईल. पण, तरीही भारताने मंगळवारी हल्ला केला. त्यावेळी आम्ही प्रत्युत्तर दिले नाही, कारण नुकसानीचा अंदाज होता. पण, आज आम्ही भारतीय हद्दीत घुसखोरी करत दाखवून दिले की आम्हीही तुमच्या देशात येऊ शकतो. युद्धामुळे कोणालाच काही साध्य होत नाही. आता चर्चेनेच आपले मुद्दे सोडविले पाहिजे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan prime minister Imran Khan takled about Indian Air Strike