Pakistan : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गंभीर आजाराचं थैमान; तीन आठवड्यांमध्ये 200 हून अधिक बालकांचा बळी

Severe disease outbreak in Pakistan's Punjab province; पाकिस्तान सरकारने म्हटलं आहे की, बहुतांश मुलांचा मृत्यू हा कुपोषणामुळे झाला आहे. सोबतच न्यूमोनियाची लस न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही अधिक आहे.
Pakistan Pneumonia outbreak
Pakistan Pneumonia outbreakeSakal

Pakistan Punjab Pneumonia outbreak : पाकिस्तानातील संकटे थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आधीच महागाईमुळे आर्थिक संकट आलेलं असताना आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात न्यूमोनियाने कहर केला आहे. या भागात गेल्या तीन आठवड्यांमध्ये न्यूमोनियामुळे तब्बल 200 पेक्षा अधिक लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. (More than 200 children died in three weeks)

एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारनेही या गोष्टीला दुजोरा दिल्याचं यात म्हटलं आहे. सरकारने म्हटलं आहे की, बहुतांश मुलांचा मृत्यू हा कुपोषणामुळे झाला आहे. सोबतच न्यूमोनियाची लस न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही अधिक आहे. (Pneumonia outbreak in Pakistan)

थंडी अन् न्यूमोनियाचा कहर

पाकिस्तानच्या बहुतांश भागात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. यामुळे लहान मुलांना न्यूमोनियाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच लसही मिळाली नसल्यामुळे कित्येक मुलांची इम्युनिटी पॉवर कमी होत चालली आहे. ही परिस्थिती पाहून पाकिस्तानातील पंजाब सरकारने 31 जानेवारीपर्यंत सकाळच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (The ravages of cold and pneumonia)

Pakistan Pneumonia outbreak
Pneumonia Outbreak : कोरोनानंतर पुन्हा एक महामारी? चीनमध्ये वेगाने पसरतोय गूढ न्यूमोनिया

पाकिस्तानच्या लाहोर प्रांतात देखील न्यूमोनियामुळे 47 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या वर्षी एक जानेवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानात न्यूमोनियाची तब्बल 10,500 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

गेल्या वर्षीची परिस्थिती

गेल्या वर्षीदेखील पाकिस्तानमध्ये हिवाळ्यात अशीच परिस्थिती पहायला मिळाली होती. गेल्या हिवाळ्यात पाकिस्तानात तब्बल 990 जणांचा न्यूमोनियाने बळी घेतला होता. सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तान सरकारने यातून काहीच धडा घेतला नसल्याचं दिसत आहे. सरकारने लोकांना मुलांची काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी आणि त्यांना गरम कपडे घालावेत असं आवाहन केलं आहे. (As many as 990 people died of pneumonia in Pakistan last winter)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com