Donald Trump : पाकिस्तानने केली हुजरेगिरी; शांततेच्या नोबेलसाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस
Nobel Peace Prize : पाकिस्तान सरकारने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०२६ साली नोबेल शांतता सन्मानासाठी शिफारस केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या समाधानासाठी ट्रम्प यांचा निर्णायक हस्तक्षेप असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा हुजरेगिरी करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची आज चक्क नोबेल शांतता सन्मानासाठी (२०२६) शिफारस केल्याने जगाला धक्का बसला आहे.