शांततेसाठी आमच्याकडून अभिनंदनची सुटका : इम्रान खान

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या (ता.28) शुक्रवारी सुटका होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत सांगितले आहे.

इस्लामाबाद - अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या (ता.28) शुक्रवारी सुटका होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत सांगितले आहे.

पाकीस्तानचे पंतप्रधान इम्रान खान संसदेत म्हणाले की, हिंदुस्थानचा वैमानिक आम्ही पकडलेला असून त्याला आम्ही उद्या सोडणार आहोत. शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचे इम्रान खान यांनी सांगितलं. तसेच, भारताकडूनही शांततेसाठी प्रयत्न होतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

 

 

तसेच इम्रान खान पुढे म्हणाले की, पाकिस्तानने उचललेल्या या पावलाला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे मूळ हे काश्मीर आहे,'' असल्याचा दावाही इम्रान खान यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Releasing Wing Commander Abhinandan Imran khan Declared