Atal Bihari Vajpayee: पाकिस्तानने जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

लाहोरः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी पाकिस्तानने जागविल्या. भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान ठरेल, असे म्हणत पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

लाहोरः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी पाकिस्तानने जागविल्या. भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान ठरेल, असे म्हणत पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत इम्रान खान म्हणाले, 'भारत-पाकिस्तानमध्ये राजकीय मतभेद आहेत. पण दोन्ही देशांना सीमेवर शांतता हवी आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करणे हीच वाजपेयींसाठी खरी श्रद्धांजली ठरेल. अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय उपखंडातील आदरणीय नेते होते. भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. वाजपेयींच्या निधनाने दक्षिण आशियातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.' इम्रान खान हे शनिवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

पाकिस्तानमधील पत्रकार व राजकीय नत्यांनी वाजपेयी यांच्या आठवणी आज जागविल्या. भारत-पाकिस्तान शांततेसाठी वाजपेयी यांनी फेब्रुवारी 1999 मध्ये लाहोरची केलेली बस यात्रा व भारत-पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी वाजपेयी यांचे प्रयत्न कधीही विसरता येणार नाहीत. खऱया अर्थाने त्यांनी प्रयत्न केले आहेत, असे पत्रकार व राजकीय नेते मसाहिद हुसेन सईद यांनी म्हटले आहे.

पत्रकार शफी नक्वी जमी, बिलावल भुट्टो, ओमर कुरेशी, मैझा हमीद गुज्जर, अमीर मतीन, मेहर तरार, शहीन सलाहुद्दीन, फवाद हुसैन यांच्यासह अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना वाजपेयींच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan remembers Vajpayee: The Indian PM who traveled to Lahore by bus