
Pakistan Attack: पाकिस्तानातील कराची-क्वेट्टा राष्ट्रीय महामार्गावरील खुजदार येथील झिरो पॉइंटजवळ एका स्कूल बसमध्ये झालेल्या स्फोटात चार मुले ठार झाली असून ३८ जण जखमी झाले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाजवळून जात असताना हा स्फोट झाला. ही घटना बुधवारी सकाळी घडली.