पाकने दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी : अमेरिका 

यूएनआय
शनिवार, 23 जून 2018

मागील काही काळापासून अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी अलीकडील काळात त्यात सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे.

वॉशिंग्टन : मागील काही काळापासून अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी अलीकडील काळात त्यात सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यावर आम्ही ठाम आहोत, असे अमेरिकेकडून पाकिस्तानला पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण आणि मध्य आशियाई विभागाच्या मुख्य उपसहायक सचिव ऍलीस वेल्स यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीवर अमेरिकी प्रशासन ठाम आहे. याबाबत पाकिस्तानला आम्ही चेतावणी दिलेली असून, त्या देशाने दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उचलली नाहीत, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan should take action against terrorists says US