पाकिस्तानने आपल्या मित्राला दिला दणका; चीनविरोधात घेतला निर्णय

कार्तिक पुजारी
Tuesday, 21 July 2020

पाकिस्तानने आपला मित्र चीनला मोठा दणका दिला आहे. भारतानंतर आता पाकिस्ताननेही बीगो (Bigo)अॅपवर बंदी आणली आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानने आपला मित्र चीनला मोठा दणका दिला आहे. भारतानंतर आता पाकिस्ताननेही बीगो (Bigo)अॅपवर बंदी आणली आहे. शिवाय टिकटॉकलाही निर्वाणीचा इशारा दिला आहे. पाकिस्तानमध्ये अश्लील आणि अनैतिक मजकूर दाखवल्याप्रकरणी ही बंदी आणण्यात आली आहे. याआधी पाकिस्तानमध्ये पबजी अॅपवरही बंदी आणण्यात आली आहे.

राफेलची पहिली तुकडी 'या' तारखेला होणार भारतात दाखल
गेल्या आठवड्यात लाहौर उच्च न्यायालयात टिकटॉकवर तात्काळ बंदी आणावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. टिकटॉक या अॅपमध्ये खूप काही वाईट गोष्टी आहेत. अॅप समाज माध्यमात प्रसिद्धी आणि रेटिंग वाढवण्यासाठी पॉर्नोग्राफीचा स्रोत बनला आहे, असं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. टिकटॉक आणि बीगो अॅप संबंधात समाजातून अनेक तक्रारी येत आहेत, असं पाकिस्तान सरकारने म्हटलं होतं.

टिकटॉक आणि बीगो यांच्याकडून आलेले उत्तर समाधानकारक नाही, असं सरकारने म्हटलं होतं. त्यानंतर सरकारमे बिगो अॅपवर बंदी आणली आहे, तर टिकटॉकला अंतिम इशारा दिला आहे. यापूर्वी देशात पबजी गेमवर बंदी आणण्यात आली आहे. ऑनलाईन मल्टिप्लेयर पबजी गेम इस्लाम विरोधी असून या गेमची तरुणांना सवय होत आहे, असं सरकारने म्हटलं होतं.

पबजी गेममुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रभाव पडत आहे. पाकिस्तानच्या टेलीकम्युनिकेशन अॅथोरिटीनुसार, पाकिस्तानमध्ये पबजी गेममुळे तरुणांवर विविध प्रकारचा मानसिक दबाव वाढत आहे.  त्यामुळे तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. पबजी गेममध्ये दाखवण्यात येणारे काही दृष्य इस्लाम विरोधी आहेत. ज्यांना पाकिस्तानमध्ये परवानगी दिली जाऊ शकत नाही.

चीनचा होकार नकाराबरोबरीचाच; सकारात्मक चर्चेनंतरही सीमारेषेवरील कुरापती सुरुच
दरम्यान, चीनच्या अडचणी वाढताना दिसत आहे. भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला होता. भारत सरकारने आक्रमकता दाखवत चीनच्या ५९ अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जगभरातून चिनीविरोधात वातावरण तापल्याचं दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या काही कंपन्यांना देशात बंदी आणली आहे. तसेच काही चिनी कंपनीच्या अॅप्सवर बंदी आणण्याची मनिषा व्यक्त केली आहे. ब्रिटननेही हुवाई या कंपनीची सेवा घेण्याचे नाकारले आहे. त्यामुळे चीनची डोकेदुखी वाढणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Took a big decision against china