esakal | पाकिस्तानला मोठा झटका; चीन अध्यक्षांचा पाक दौरा रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan and xi jinping.jpg

जिनपिंग यांच्या दौऱ्यातून पाकिस्तान सरकारला खुप अपेक्षा आहेत.

पाकिस्तानला मोठा झटका; चीन अध्यक्षांचा पाक दौरा रद्द

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

रावळपिंडी- कोरोना संसर्गामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा प्रस्तावित पाकिस्तान दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज चीनच्या दुतावासातील अधिकारी याओ जिंग यांनी दिली. जिनपिंग यांच्या दौऱ्यातून पाकिस्तान सरकारला खुप अपेक्षा आहेत. तसेच अनेक महत्त्वाचे संरक्षण आणि आर्थिक करार होण्याची शक्यता आहे. परंतु दौरा पुढे ढकलल्याने तूर्त पाकिस्तानच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. याशिवाय जिनपिंग यांचा दौरा पुढे ढकलण्यामागे सीपीइसीच्या प्रकल्पाला होणारा विलंब हे कारण असल्याची चर्चा आहे. विलंबामुळे चीन नाराज असल्याने अध्यक्षांनी पाकिस्तानला येण्याचे टाळल्याने इम्रान खान सरकारला दणका बसला आहे.

चीनचे विमान पाडले का नाही? तैवानने केला खुलासा

सौदी अरेबियाशी पाकिस्तानचे संबंध बिघडलेले असताना चीनच्या अध्यक्षांचा दौरा रद्द होणे हा पाकिस्तान सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानच्या नजरा चीनवर खिळलेल्या आहेत. परंतु आता चीनने देखील पाकिस्तानकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. अर्थात कोविड-१९ मुळे चीन अध्यक्षांचा दौरा स्थगित केला असल्याचे चिनी दुतावासाने म्हटले आहे. शी जिनपिंग यांच्या नव्या दौऱ्याची तारीख लवकरच घोषित केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निमंत्रणावरून चीनचे अध्यक्ष पाकिस्तानला भेट देणार आहेत. चिनी राजदुताच्या मते, आर्थिक कॉरिडॉरच्या प्रगतीने चीन समाधानी आहे आणि दोन्ही देश प्रकल्पातील येणाऱ्या अडथळ्यांना चांगले जाणून आहेत. परंतु दुसरीकडे चीनचे अध्यक्ष सीपीईसीच्या प्रगतीवरून खूश नसल्याचे सांगितले जात आहे.

असा मारा समाजमाध्यमी डोहातील अफवांचा कालिया

चिनी नागरिकांवर हल्ले

कोरोना संसर्गामुळे उभय देशांतील संयुक्त प्रकल्पाचे काम रेंगाळलेले असताना दुसरीकडे बलुचिस्तान येथे दहशतवाद्यांचे हल्ले वाढलेले आहेत. ६० अब्ज अमेरिकी डॉलर खर्चाच्या या योजनेच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने विशेष पथकाचे स्थापन केले आहे. यात १३७०० स्पेशल कमांडोंचा समावेश आहे. परंतु या योजनेवर काम करणाऱ्या चिनी नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. जूनमध्ये कराची स्टॉक एक्स्चेंजवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीच्या माजिद ब्रिगेडने घेतली होती.