15 ऑगस्टला काळा दिवस पाळा; पाक सरकारचे आदेश

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पाकिस्तानने असे आदेश आपले शेपूट वाकडेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने या संदर्भातले एक पत्रकच प्रसिद्ध केले आहे. सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ चॅनल्स या सगळ्यांना ही सूचना पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर थयथयाट झालेल्या पाकिस्तानने आता भारताचा स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) काळा दिवस म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. सरकारने या संबंधिचे आदेश रेडिओ व वृत्तवाहिन्यांना दिले आहेत.
 
पाकिस्तानने असे आदेश आपले शेपूट वाकडेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने या संदर्भातले एक पत्रकच प्रसिद्ध केले आहे. सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ चॅनल्स या सगळ्यांना ही सूचना पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी कोणताही विशेष कार्यक्रम करायचा नाही. काश्मीरसंदर्भात आत्मियता असलेल्या बातम्या आणि व्हिडिओच प्रसारित करावेत असे यात म्हटले आहे. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असताना आता हा निर्णय घेण्यात आला आहे.  पाकिस्तानने 14 ऑगस्टला म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यदिनी हा दिवस आपल्या काश्मीरच्या एकतेचे प्रतीक म्हणून साजरा केला जावा असेही म्हटले आहे. तर, 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणूनच दाखवला गेला पाहिजे. या दिवशी झेंडाही अर्ध्यावर आणावा. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या भूमिका काय आहेत हे दाखवणारे व्हिडिओज दाखवले जावेत. इतकेच नाही तर पाकव्याप्त काश्मीरबाबत पाकिस्तानची भूमिका काय तेही स्पष्ट करावे असे आदेश देण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan TV radio stations to air anti India shows on August 15