पाक सदैव काश्‍मिरींच्या पाठीशी- इम्रान खान 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

काश्‍मीरमधील जनतेला पाकिस्तानकडून सदैव राजनैतिक, राजकीय आणि नैतिक सहकार्य पुरविण्यात येईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केले. मानवी हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर खान यांनी हे वक्तव्य केले आहे.

इस्लामाबाद- काश्‍मीरमधील जनतेला पाकिस्तानकडून सदैव राजनैतिक, राजकीय आणि नैतिक सहकार्य पुरविण्यात येईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केले. मानवी हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर खान यांनी हे वक्तव्य केले आहे.

"मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याच्या घटनेला 70 वर्षे पूर्ण होत असताना, काश्‍मीरमधील नागरिकांना पाकिस्तानकडून या पुढेही राजनैतिक, राजकीय आणि नैतिक पाठिंबा देण्यात येईल. मानवाधिकार आणि सन्मानासाठीच्या लढ्यात पाकिस्तान सदैव काश्‍मिरी जनतेच्या पाठीशी राहील,'' असा दावा खान यांनी केला. खान यांच्या वक्तव्यावर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan will continue to lend full support to people of Kashmir: Imran Khan