esakal | कुलभूषण जाधव यांची केस लढण्यास पाकिस्तानी वकीलांचा नकार
sakal

बोलून बातमी शोधा

kulbhushan jadhavkulbhushan jadhav

पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत असलेले भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांची केस लढण्यास पाकिस्तानी वकीलांनी नकार दिला आहे.

कुलभूषण जाधव यांची केस लढण्यास पाकिस्तानी वकीलांचा नकार

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत असलेले भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांची केस लढण्यास पाकिस्तानी वकीलांनी नकार दिला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जाधव यांच्यातर्फे केस लढण्यासाठी काही वकीलांना निवडले होते. पाकिस्तानी सरकारने याआधीच भारतीय वकीलांच्या नेमणुकीला नकार दर्शवला होता. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा कोणता कट रचत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे.  

रिलायन्सनंतर आणखी एका भारतीय कंपनीने ओलांडला 10 लाख कोटी बाजारी भांडवलाचा टप्पा

केस लढण्यासाठी वकीलांनी दिला नकार

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानमधील दोन सर्वात वरिष्ठ वकील आबिद हसन मिंटो आणि मखदूम अली खान यांच्याकडे मदत मागितली होती. दोन्ही वकीलांनी कुलभूषण जाधव यांच्यातर्फे न्यायालयात हजर होण्यास नकार दर्शवला आहे. त्यांनी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाला आपल्या निर्णयाबाबत कळवले आहे. आबिद हसन मिंटो यांनी म्हटलं की, ते सेवानिवृत्त झाले आहेत, त्यामुळे ते वकिली करु शकणार नाहीत. दुसरीकडे, मखदूम अली खान यांनी आपण व्यस्त असल्याचे कारण सांगितले आहे. 

काऊंसलर नियुक्त करण्यास पाकिस्तानचा नकार

पाकिस्तान सरकारने कुलभूषण जाधव प्रकरणात भारतीय वकील किंवा क्विंस काऊंसलर नियुक्त करण्याच्या भारताच्या मागणीला याआधीच फेटाळून लावलं आहे. पाकिस्तानमध्ये ज्यांना वकिली करण्याचा परवाना आहे, अशांनाच न्यायालयात उपस्थित राहण्याची परवानगी असेल, असं पाक सरकारने भारताकडे स्पष्ट केले होते. 

आता 'बासमती तांदळा'साठी पाकिस्तान भारताशी लढणार, जाणून घ्या नवा वाद

ICJ निर्देशानंतर पाकिस्तानने आणला अध्यादेश

पाकिस्तानच्या खेळीमुळे कुलभूषण जाधव यांना उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची संधी मिळाली नाही. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या ICJ आदेशानंतर पाकिस्तानने असा अध्यादेश आणला होता. जाधव यांना राजनैतिक मदत देण्यास नकार दिल्यानंतर भारताने 2017 मध्ये पाकिस्तान विरोधात ICJ चे दार ठोठावले होते. दरम्यान, हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली एप्रिल 2017 मध्ये कूलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानने जाधव यांच्यावर केलेले आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. शिवाय त्यांना वाचवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. 

(edited by- kartik pujari)