
पाकिस्तानी लष्कराने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) विरुद्ध मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सरबकाफ सुरू केले आहे. ही कारवाई प्रामुख्याने लोई मामुंड आणि वार मामुंड तहसीलमध्ये सुरू आहे. जे पूर्वी टीटीपीचे गड मानले जात होते. अलिकडेच, तालिबान कमांडर्ससोबत शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर २७ भागात १२ ते ७२ तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.