esakal | पाकिस्तानी लष्करावर टीका करणाऱ्या ब्लॉगरची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

pakistani blogger muhammad bilal khan shot dead at islamabad

पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर विभाग आयएसआयवर वारंवार टीका करणारा पाकिस्तानी ब्लॉगर व मुक्त पत्रकाराची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली.

पाकिस्तानी लष्करावर टीका करणाऱ्या ब्लॉगरची हत्या

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबादः पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर विभाग आयएसआयवर वारंवार टीका करणारा पाकिस्तानी ब्लॉगर व मुक्त पत्रकार मोहम्मद बिलाल खान (वय 22) याची रविवारी (ता. 16) रात्री अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली.

मोहम्मद बिलाल खान सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. सोशल मीडियावर त्याचे मोठे चाहते होते. ट्विटवरवर 16 हजार फॉलोअर्स, यूट्यूब चॅनेलवर 48 हजार तर फेसबुकवर 22 हजार फॉलोअर्स होते. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर विभाग आयएसआयवर वारंवार टीका केल्यामुळे तो नेहमीच चर्चेत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद बिलाल खान हा रविवारी रात्री आपल्या मित्रासोबत होता. यावेळी त्याला फोन आला होता. त्या व्यक्तीने मोहम्मद बिलाल खानला जवळच्या जंगलात घेऊन गेले व हत्या केली. यावेळी गोळीबार केल्याचा आवाज आला होता. मोहम्मदच्या वडीलांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील चौकशी करत आहोत.

पोलिस अधिक्षक सद्दार मलिक नईम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मदच्या हत्येसाठी धारदार वस्तूचा वापर करण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र, काही लोकांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आहे. यावेळी मोहम्मद बिलाल खान याच्यासोबत असणाऱा त्यांचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे.

मोहम्मद बिलाल खान याच्या वडीलांनी मुलाच्या शरिरावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे सांगितले. 'माझा मुलगा ईश्वराबद्दल बोलत होता एवढीच काय ती चूक होती, असं त्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली झाली असून, सोशल मीडियावर #Justice4MuhammadBilalKhan ट्रेंडला सुरवात झाली आहे. नेटिझन्सनी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयवर टीका केल्यानेच हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे.

loading image
go to top