Video: पाकची नवरी म्हणाली, हाथ लावला तर मारून टाकेन...

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

पाकिस्तानमधील एका नवरीच्या दोन मिनिटांचा व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हाथ लावलास तर मारून टाकेन, असा दम तिने एका पत्रकाराला दिला.

लाहोर : पाकिस्तानमधील एका नवरीच्या दोन मिनिटांचा व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नवरीने लग्नात दागिन्यांऐवजी टॉमॅटो घातले आहेत. माझ्या दागिन्यांना हाथ लावलास तर मारून टाकेन, असा दम तिने एका पत्रकाराला दिला.

पाकिस्तानमधील महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. भारताने निर्यातबंदी घातल्यानंतर दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अन्न पदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोने परवडेल पण अन्न् परवडत नाही, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक देत आहेत. पाकिस्तानमधील एका नवरीने आपल्या लग्नात सोन्यांच्या दागिन्यांऐवजी अंगावर चक्क टोमॅटोंचे दागिने घातले आहेत. यामागील कारणही तिने सांगितले आहे.

भारताने निर्यातबंदी घातल्यानंतर पाकिस्तानमध्ये टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटोच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की लोक विकतही घेत नाही आहेत. अनेकजण टोमॅटो महिनाभर जपून वापरत आहे. पाकिस्तानचे टोमॅटो आणि सोन्याच्या किमतीत जास्त फरक नाही आहे, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पाकिस्तानच्या एक नवरीच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे, याचे चित्र जगासमोर येऊ लागले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवरीने टोमॅटोचे दागिने घातले आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या टोमॅटोच्या किंमती 300 रुपये किलो आहे. पत्रकारांशी बोलताना नवरी म्हणाली, 'देशामध्ये सोन्यापेक्षा टोमॅटोच्या किंमती जास्त आहेत. त्यामुळं मी माझ्या लग्नात टोमॅटो दागिने म्हणून परिधान करण्याचा निर्णय घेतला. माझ्या दागिन्यांना हाथ लावलास तर मारून टाकेन. नवऱ्या मुलीच्या आई-वडिलांनी लग्नात मला भेट म्हणून तीन-चार पेटी टोमॅटो दिले आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistani bride jewelry made of tomatoes for wedding video viral