जम्मू-काश्मिरात पाकिस्तानचे ड्रोन पाडले

पीटीआय
Sunday, 21 June 2020

पाकच्या गोळीबारात चार नागरिक जखमी 
बारामुल्ला येथील रामपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये चार भारतीय नागरिक जखमी झाले असल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी शनिवारी दिली.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यालगत असलेल्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी शनिवारी पहाटे पाकिस्तानचे एक ड्रोन पाडल्याची माहिती लष्करातील अधिकाऱ्यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या ड्रोनमधून ७ ग्रेनेड, एक एम-४ रायफल, दोन मॅगझिन, ६० राऊंड गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा ड्रोन आकाराने मोठा असल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. बीएसएफच्या एका पथकाने कठुआमधील हिरानगर सेक्टरच्या रथुआ परिसरात सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी हे ड्रोन उडताना पाहिले होते. या ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानातून काश्मीरमध्ये हत्यार पोचवण्याचे प्रयत्न सुरू होते. याअगोदरही अनेकदा भारतीय सुरक्षा दलाकडून या पद्धतीच्या हत्यारांच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani drones shot down in Jammu and Kashmir