पाकिस्तानचे दहशतवाद्यांना अभय कायम

एएनआय
Monday, 21 September 2020

पाकिस्तानच्या दुटप्पी वागणूकीवर जगभरातील अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय दिला जात असल्याबद्दल ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानचे नाव ग्रे लिस्टमध्ये अनेक वर्षांपासून कायम ठेवले आहे.

इस्लामाबाद - फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या जागतिक संस्थेकडून निर्बंधांची टांगती तलवार डोक्यावर असतानाही दहशतवाद्यांना शाही वागणूक देण्याची लाचारी पाकिस्तान सरकारने कायम ठेवली आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या काळ्या यादीत असलेले अनेक दहशतवादी पाकिस्तानमध्ये केवळ मुक्तपणे फिरतच नाहीत, तर त्यांची बडदास्तही ठेवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा दहशतवादी रणजितसिंग नीता याचा समावेश आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या दुटप्पी वागणूकीवर जगभरातील अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय दिला जात असल्याबद्दल ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानचे नाव ग्रे लिस्टमध्ये अनेक वर्षांपासून कायम ठेवले आहे. यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज मिळविण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्याचा इशारा ‘एफएटीएफ’ने अनेक वेळा दिला असला तरी सरकारकडून दहशतवाद्यांविरोधात काहीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे नाटक करताना पाकिस्तान सरकार अशा संघटनांना मोठा निधी देत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकमध्ये वास्तव्यास असलेल्या २१ दहशतवाद्यांना ‘व्हीआयपी’ वागणूक मिळते आहे. या यादीत दाऊद, बब्बर खालसा संघटनेचा प्रमुख वाधवा सिंग, इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख रियाज भटकळ, मिर्झा शादब बेग आणि अफिफ हसन सिद्दीबापा यांचा समावेश आहे. भारतात मोठे हल्ले केलेल्या दहशतवाद्यांना पाकमध्ये विशेष वागणूक मिळत असल्याचे दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani government has maintained its inability to deal with terrorists

Tags
टॉपिकस
Topic Tags: