पाकिस्तानी खासदाराचं तिसरं लग्नही मोडणार; 'ही' मुलगी चौथी पत्नी बनण्यास तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Liaquat Hussain Syeda Dania Shah

सध्या पाकिस्तानमध्ये अनेक घडामोडी होताना दिसत आहेत.

पाकिस्तानी खासदाराचं तिसरं लग्नही मोडणार; 'ही' मुलगी चौथी पत्नी बनण्यास तयार

सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. आधी इम्रान खान यांना पंप्रधान पदावरून पाय उतार व्हावं लागलं, त्यानंतर पीटीआय पार्टीचे खासदार आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट आमिर लियाकत (Aamir Liaquat Hussain) यांच्या वैवाहिक जीवनाला सुरूंग लागताना दिसत आहे. लियाकत यांची तिसरी पत्नी सैयदा दानिया शाह (Syeda Dania Shah) यांनी त्यांच्याकडं तलाक मागितलाय.

सैयदा यांनी तलाक (तलाक घेण्याचा महिलांचा अधिकार) साठी अर्ज दाखल केलाय. तसेच आमिर टीव्हीवर दिसतात तसे नाहीयेत. ते सैतानापेक्षाही भयंकर आहेत, असा आरोप सैयदा यांनी लगावलाय. त्याचबरोबर घटस्फोटापोटी (Divorce) सैयदा यांनी आमिर यांच्याकडून 11.5 कोटी रुपये, घर आणि दागिण्यांची मागणी केली होती. त्यानंतर आता लियाकत यांचा बेडरूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) लीक झालाय. लियाकतची तिसरी पत्नी दानिया शाह हिनं हा व्हिडिओ लीक केल्याचं बोललं जातंय. त्यानंतर आता लियाकत यांचं काही आक्षेपार्ह व्हिडिओ (Controversy Videos) सोशल मीडियावर लीक झाल्यानं सगळीकडं चर्चा सुरूय.

हेही वाचा: बॉडीगार्डशिवाय छोट्या कारमध्ये रतन टाटा; दिग्गज उद्योगपतीच्या साधेपणाचा Video Viral

याच दरम्यान, पाकिस्तानी खासदार आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट आमिर लियाकतच्या तिसर्‍या पत्नीनं त्याच्याकडून घटस्फोट मागितल्यानंतर आणखी एका महिलेनं लियाकतशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केलीय. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून लियाकतची तिसरी पत्नी दानिया शाहची मैत्रीण एलिजा आहे. एलिजाचं म्हणणं आहे की, 'ती लियाकतची चौथी पत्नी बनण्यास तयार आहे.'

हेही वाचा: मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणाऱ्या 'आप'च्या नेत्याचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिनं लियाकतवरील दानियाचे आरोप फेटाळून लावले असून लियाकत हे धार्मिक व्यक्ती असून मला ते आवडतात, असं म्हटलंय. मी आमिर लियाकतशी कोणत्याही परिस्थितीत लग्न करण्यास तयार असल्याचं तिनं ठणकावून सांगितलंय. लियाकतची तिसरी पत्नी दानिया शाहनं त्याच्यापासून घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतलीय. दानियानं याच वर्षी फेब्रुवारीमध्ये आमिर लियाकतसोबत लग्न केलं होतं. तिनं लियाकतवर ड्रग्ज आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केलाय.

दानिया आणि लियाकत यांच्यात एकमेकांवर आरोप करण्याची प्रक्रिया सुरूच होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लियाकतचा एक न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता. हा व्हिडिओ लीक केल्याचा आरोप दानियावर होत आहे. सोशल मीडियावर लीक झालेल्या या व्हिडिओत लियाकत न्यूड अवस्थेत दिसत आहे. बेडवर ड्रग्जही ठेवण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. या व्हिडिओवरून लियाकत त्याची तिसरी पत्नी दानियावर चिडला आणि त्यानं तिच्यावर निकाहसारख्या पाक संबंधांना तोडफोड केल्याचा आरोप केलाय.

हेही वाचा: 'विधवा प्रथा' बंद करणाऱ्या हेरवाड, माणगाव पंचायतींना सामाजिक पुरस्कार जाहीर

यासोबतच लियाकत यांनी न्यायपालिका आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटीच्या सायबर क्राईम विंगवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केलेत. दरम्यान, दानियानं व्हिडिओ लीकचे आरोप फेटाळून लावले आहेत. मुलाखतीदरम्यान तिनं सांगितलं की, मी कोणाचाही व्हिडिओ बनवला नाही, हा व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला आहे, असं तिनं नमूद केलंय.

Web Title: Pakistani Mp Aamir Liaquat Third Wife Syeda Dania Shah Friends Wants To Marry Him

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PakistanDivorce Cases
go to top