'त्याने' केले पुराचे वार्तांकन 'ओव्हरबोर्ड'वरून

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

पाकिस्तानातील लाहोर येथे संततधार पडणाऱ्या पावसामुळे परिसरात पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी पाकिस्तानी बातमीदार मुलांच्या खेळण्याच्या होडीतून गेला.

लाहोर : उन्हाळा, हिवाळा असो की पावसाळा कोणत्याही ऋतूमध्ये बातमीदार परिस्थितीचे वार्तांकन करत असतो. आपली बातमी इतरांपेक्षा अधिक लवकर लोकांपर्यंत पोचविण्यासाठी अनेक बातमीदारांमध्ये स्पर्धाही लागलेली असते. असेच पावसामुळे आलेल्या पूराचे वार्तांकन करण्यासाठी पाकिस्तानातील एका बातमीदाराने चक्क लहान मुलांच्या खेळण्याच्या होडीतून (ओव्हरबोर्ड) वार्तांकन केले. या बातमीदाराने केलेल्या वार्तांकनाची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे.

पाकिस्तानातील लाहोर येथे संततधार पडणाऱ्या पावसामुळे परिसरात पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी पाकिस्तानी बातमीदार मुलांच्या खेळण्याच्या होडीतून गेला. वृतांकन करतानाचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित बातमीदार एका गुलाबी रंगाच्या खेळण्याच्या होडीतून परिस्थितीचे वार्तांकन करत असल्याचे दिसत आहे. 

याबाबत संबंधित बातमीदाराने सांगितले, की ''मी स्विमिंग पूलमध्ये नाही. पण पुरामुळे रस्त्याच्या मध्यभागी पाणी साचल्याने शहराचा काही भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे याचे वार्तांकन करण्यासाठी मी तेथे गेलो. मी वॉटर पूलमध्ये आनंदी आहे'', असे म्हणत त्याने येथील लोकांना सांगितले, की तुम्हीही येथे अशा पद्धतीने या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Pakistani reporter goes overboard to cover monsoon floods