esakal | Video: गुहेतून मुलाचा फक्त हात दिसत होता...
sakal

बोलून बातमी शोधा

rescuer saves boy by grabbing his hand at china video viral

एक सात वर्षीय मुलगा आपल्या आजोबांसोबत फिरायला गेला होता. मुलगा अचानक गायब झाला. काही वेळातच एका गुहेतून त्याचा हात बाहेर आला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: गुहेतून मुलाचा फक्त हात दिसत होता...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

झेजियांग (चीन): एक सात वर्षीय मुलगा आपल्या आजोबांसोबत फिरायला गेला होता. मुलगा अचानक गायब झाला. काही वेळातच एका गुहेतून त्याचा हात बाहेर आला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केंद्रीय मंत्री म्हणतात; 'भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा...

चीनच्या झेजियांग प्रांतातील योंगझिया काउंटी येथे 22 जुलै रोजी ही घटना घडली आहे. आजोबा नातवाचा शोध घेत असताना, अचानक गावकऱ्यांना जमिनीतील एका छोट्या खड्ड्यातून बाहेर येणारा हात दिसला. एक मुलगा गुहेत अडकल्याचे कळताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटातच या मुलाला खड्डयातून बाहरे काढले.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'जमिनीखाली गुहा असल्याची माहिती कोणाला नव्हती. या मुलाला गुहेतून बाहेर काढल्यानंतर गुहा बुजविण्यात आली आहे.' दरम्यान, गुहेतून मुलाला बाहेर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

न्यायालयात ठोकली आरोळी; नवरी कोरोना पॉझिटिव्ह...