भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या वेबसाईटवर 'जय श्रीराम'!

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 15 August 2020

भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या वेबसाईट्सवर शुभेच्छांचा संदेश पाहायला मिळाला.

इस्लामाबाद- भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या वेबसाईट्सवर शुभेच्छांचा संदेश पाहायला मिळाला. पाकिस्तानी लोकांनी असं केलं नसून हॅकर्संनी हा कारनामा केला आहे. पाकिस्तानच्या फातिमा जिन्नाह महिला विश्वविद्यालयासह अन्य वेबसाईट्सवर भारताचा तिरंगा फडकत असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे वेबसाईटवर भगवान राम यांचे छायाचित्र आणि मंदिर निर्माणासंबंधी मजकूर साईटवर लिहिण्यात आला होता. 

74th independence day: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

पाकिस्तानची वेबसाईट peterco.com.pk ला हॅक करण्यात आले होते. या वेबसाईटच्या होमपेजवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा आणि भगवान राम दिसून आले. 'इंडियन सायबर ट्रूप' नावाच्या हॅकर्सने हे काम केले असल्याचे सांगण्यात येत आहे. पेजवर सर्वात वरती तिंरग्यासोबत सत्यमेव जयतेही लिहिण्यात आले होते. त्याखाली भारताचा तिरंगा घेऊन पळणाऱ्या लहान मुलांचा फोटो होतो आणि त्यानंतर भारताच्या स्वातंत्रदिवशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. 

विशेष म्हणजे या पेजवर भगवान राम यांचा मोठा फोटोही दिसून आला. फोटोखाली लाहौर आणि कराचीमध्येही राम मंदिर बनवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर देशासाठी शहीद झालेल्या जवानांना समाल करण्यात आला आहे. याशिवाय फातिमा जिन्नाह विमिन यूनिवर्सिटी वेबसाईट हॅक करण्यात आली. या साईटवरही असेच फोटो दिसून आले. त्यानंतर काही काळासाठी ही वेबसाईट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ही वेबसाईट ओपन होत नाहीये. 

ध्वजावंदनच्या वेळी PM मोदींसोबत दिसलेल्या लष्करी महिला अधिकारी कोण माहितेय का?

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या डॉन या वृत्तवाहिनीलाही हॅकर्सनी हॅक केले होते. या वाहिनीवर जाहीरात सुरु असताना अचानक स्क्रिनवर तिरंगा फडकू लागला. काहीवेळासाठी हा तिरंगा फडकत होता. या सर्व प्रकारामुळे पाकिस्तानी नागरिकांचा गोंधळ उडाला होता. डॉन वेबसाईटने यावर खुलासा करत वेबसाईट हॅक करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय या प्रकरणी तपास करत असल्याचं डॉनकडून सांगण्यात आलं होतं. 

दरम्यान, भारत आज 74 वा स्वातंत्र्यादिन साजरा करत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरुन बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावेळीचा स्वातंत्र्यदिन खबरदारी घेत साजरा करण्यात आला. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistani website hacked on indian independence day