पत्नीला प्रसिद्धी मिळतेय या रागातून पतीनेच केली पाकमधील पत्रकार महिलेची हत्या?

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

या घटनेतील मृत महिला पत्रकार शाहीना या PTV या वृत्तवाहिनीत अँकर तसेच एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकपदी कार्यरत होत्या. तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पाकिस्तानमधील बलुचिस्तान जिल्ह्यात महिला पत्रकाराची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही हत्या तिच्या पतीने केल्याचा आरोप करण्यात येतोय. पाकिस्तानमधील घरगुती वादाचा प्रकार वाढत असून यासंदर्भात आवज उठवणाऱ्या महिला पत्रकारच आता याची बळी ठरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

मोठी बातमी : गुजरात दंगलीप्रकरणी खटल्यातून न्यायालयाने मोदींचे वगळले नाव

या घटनेतील मृत महिला पत्रकार शाहीना या PTV या वृत्तवाहिनीत अँकर तसेच एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकपदी कार्यरत होत्या. तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तिची प्रसिद्धी पतीला आवडत नव्हती, यातूनच त्याने हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक नजीबुल्लाह पंडरानी यांनी हत्या घरगुती वादातून झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.  मृत महिला पत्रकाराच्या कुटुंबियांनी तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिस यावर काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.  

 उद्योगस्नेही टॉप टेन राज्यात महाराष्ट्र नाहीच; शेजारी राज्य पहिल्या क्रमांकावर

शाहीनाने इस्लामाबादमधील एका खासगी टीव्ही वाहिनीवरही काम केलं होतं. यानंतर ती एका सरकारी टीव्ही चॅनेलमध्ये रुजू झाली होती. इस्लामाबादमधून शाहीनाची तूरबत इथल्या बलुचिस्तानमध्ये बदली करण्यात आली. इथं ती एका स्थानिक मासिकाची संपादक म्हणून कार्यरत होती. स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार,  शाहनाची तिच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते. त्यांनी घरात शिरुन शाहनावर गोळ्या झाडल्या. पाच गोळ्या लागल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर  शाहीनाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. पोलिस या घटनेचा तपास करत असून तिच्या पतीला यात अटक होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani woman journalist allegedly shot dead by husband