Tarek Fatah: प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक, स्तंभलेखक तारेक फतेह यांचं निधन

दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत त्यांनी कायमच आक्रमक भूमिका घेतली आहे.
tarek-fatah
tarek-fatah

नवी दिल्ली : पाकिस्तान-कॅनेडिअन प्रसिद्ध लेखक आणि स्तंभलेखक तारेक फतेह (वय ७३) यांचं सोमवारी निधन झालं. बऱ्याच काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते, अखेर कॅनडातच त्यांची प्राणज्योत मालवली. फतेह यांच्या कन्या नताशा फतेह यांनी वडिलांच्या मृत्यूची बातमी ट्विटद्वारे दिली. (Pakistani writer and Columnist Tarek Fatah Dies)

नताशा फतेह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, "पंजाबचा सिंह, भारताचा पुत्र, कॅनडाप्रेमी, सत्यप्रेमी, न्यायाचा लढवय्या अशा उपमा देत त्यांनी तारेक फतेह यांचं निधन झाल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या हिंतचिंतकांकडून त्यांचं क्रांतीकारी काम पुढे सुरुच राहिलं, तुम्हाला या कामात सहभागी व्हायला आवडेल का? असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

tarek-fatah
Sambhaji Nagar Controversy : "...तोपर्यंत औरंगाबादचे नाव बदलू नये" मुंबई हायकोर्टाचा आदेश! इम्तियाज जलील म्हणाले...

तारेक फतेह यांचा जन्म पाकिस्तानात १९४९ रोजी झाला. १९८०च्या दशकात त्यांनी कॅनडात स्थलांतर केलं. त्यांनी कायमच दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत कायमच आक्रमक भूमिका घेतली. इस्लामबाबत त्यांचे पुरोगामी विचार होते. त्याचबरोबर त्यांनी भारतातील भाजपप्रणित एनडीए सरकारचं समर्थन केलं होतं. पत्रकार तसेच टिव्ही होस्टशिवाय त्यांनी अनेक पुस्तकं आणि स्तंभलेखनही केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com