esakal | ISI चे चीफ फैझ हमीद काबुलमध्ये दाखल, पडद्यामागे काय घडणार?
sakal

बोलून बातमी शोधा

फैझ हमीद आयएसआय प्रमुख

ISI चे चीफ फैझ हमीद काबुलमध्ये दाखल, पडद्यामागे काय घडणार?

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे (ISI) प्रमुख जनरल फैझ हमीद (Faiz Hameed) अफगाणिस्तानची (afganistan) राजधानी काबुलमध्ये (Kabul) दाखल झाले आहेत. तालिबानच्या निमंत्रणावरुन फैझ हमीद अफगाणिस्तानला गेले आहेत. पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारपेक्षा सैन्य आणि ISI चा दबदबा जास्त आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणामध्ये सैन्य आणि आयएसआयची भूमिका निर्णायक ठरते.

त्यामुळे ISI चे प्रमुख अफगाणिस्तानात दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानात आयएसआय प्रमुखपदाला वजन आहे. या भेटीमागचं उद्दिष्टय अजून स्पष्ट झालेले नाहीय. पण फैझ हमीद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अफगाणिस्तान-पाकिस्तान संबंधांच भविष्य, आर्थिक आणि व्यापारी संबंधांविषयी तालिबानी नेतृत्वाबरोबर चर्चा करतील.

हेही वाचा: जावेद अख्तर यांच्यामध्ये तालिबानी DNA : आचार्य तुषार भोसले

पाकिस्तानच्या आयएसआयचा तालिबानवर प्रभाव आहे. आयएसआयने नेहमीच तालिबानला मदत केलीय. पाकिस्तानने उघडपणे तालिबानच्या सरकारला मान्यता देण्याची भूमिका घेतली आहे. तालिबानने सहजतेने अफगाणिस्तान काबीज केला, त्यामागे पाकिस्तानची मदत असल्याची चर्चा आहे. अफगाणिस्तानात पाकिस्तानचं मजबूत होणं, भारतासाठी चिंतेचा विषय आहे. कारण पाकिस्तान तालिबानचा वापर भारताविरोधात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने भारतालाही आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागेल.

loading image
go to top