esakal | जावेद अख्तर यांच्यामध्ये तालिबानी DNA : आचार्य तुषार भोसले
sakal

बोलून बातमी शोधा

आचार्य तुषार भोसले

जावेद अख्तर यांच्यामध्ये तालिबानी DNA : आचार्य तुषार भोसले

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर (javed akthar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषदेची तालिबानसोबत (Taliban) तुलना केली आहे. त्यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (acharya tushar bhosale) यांनी जावेद अख्तर यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.

"भारताची सत्ता संघ स्वयंसेवकांच्या हाती असतानाही तालिबानी डीएनए असलेले जावेद अख्तर सारखे देशद्रोही आमच्या देशात सुरक्षित पणे राहतात आणि वाट्टेल तसे विषारी फुत्कार सोडतात यातूनच संघाचे धोरण आणि विचारधारा लक्षात येते पण भेदवृत्ती असलेल्या या समाजकंटकांना कसे कळणार ?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा: पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

संघ परिवारातील अनेक जण जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर संतापले आहेत. भारतात तालिबानचे (Taliban) समर्थन करणाऱ्या मुस्लिमांवर (Muslim) टीका करताना गीतकार जावेद अख्तर (javed akthar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषदेची तालिबानसोबत तुलना केली. "जावेद अख्तर यांनी आपलं विधान मागे घेऊन, हिंदू सामाजाची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करु" असा इशारा मुंबईतील भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

loading image
go to top