

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील ट्रेन अपहरणाच्या घटनेला २४ तासा उलटून गेले आहेत आणि पाकिस्तान सरकार बंडखोरांसमोर हतबल दिसत आहे. पाकिस्तानी लष्कराने बंडखोर गटाविरुद्धच्या जमिनीवरील कारवाईत आपले अनेक सैनिक गमावले आहेत. बंडखोरांनी प्रवाशांना धमकी दिल्यानंतर शाहबाज सरकार हवाई हल्ल्याचा विचार करत आहे.