

Fear of Rising Poverty Again as Global Crises Reverse Development: PM Modi
esakal
"सततची युद्धे आणि जागतिक अस्थिरतेमुळे गेल्या काही दशकांपासून सुरू झालेल्या विकास प्रक्रियेची पीछेहाट होण्याचा धोका आहे. यामुळे मोठी लोकसंख्या पुन्हा गरिबीच्या खाईत लोटली जाऊ शकते," असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिला. या आव्हानांचा सामना करण्यासाठी लवचिक आणि विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळी निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.