esakal | अखेर तालिबानने जिंकलं पंजशीर खोरं
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

अखेर तालिबानने जिंकलं पंजशीर खोरं

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: तालिबानने संपूर्ण पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. पंजशीर (panjshir) खोऱ्यात तालिबानशी (Taliban) दोन हात करणाऱ्या रेसिस्टन्स फोर्सने (Resistance force) शस्त्रसंधीची मागणी केली होती. तालिबानने पंजशीर वगळता अफगाणिस्तानच्या (Afganistan) सर्व प्रांतांवर नियंत्रण मिळवलं होतं. अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली रेसिस्टन्स फोर्स इथे लढत होती. तालिबानने वीजेसह रसद पुरवठ्याचे त्यांचे सर्व मार्ग बंद केले होते. रेसिस्टन्स फोर्सने युद्ध थांबवण्याची मागणी केली होतं. पंजशीर खोर आतापर्यंत तालिबानला कधीही जिंकता आलं नव्हतं. पण आता मात्र पंजशीर त्यांच्या नियंत्रणात आलं आहे. मागच्या एक-दोन दिवसात पंजशीर खोऱ्यात रेसिस्टन्स फोर्सचं मोठं नुकसान झालं आहे.

तालिबानने पंजशीर खोऱ्यात लष्करी कारवाई थांबवावी व आपली फोर्स मागे घ्यावी. आम्ही सुद्धा आमच्या योद्धयांना लष्करी प्रत्युत्तर न देण्याचे निर्देश देऊ, असा प्रस्ताव रविवारी नॅशनल रेसिस्टन्स फोर्सकडून तालिबानला पाठवण्यात आला होता.

तालिबान हा प्रांत सोडणार असेल, तर रेसिस्टन्स फोर्स त्यांच्यासोबत चर्चा करेल, अहमद मसूदने म्हटल्याचे वृत्त स्पुटनिकने दिले होते. तालिबानने पंजशीर खोऱ्यात लष्करी कारवाई थांबवली, तर शांततेसाठी नॅशनल रेसिस्टन्स फोर्सही युद्ध थांबवेल. विचारवंत आणि सुधारणावाद्यांशी आम्ही चर्चा करु असे मसूदने रविवारी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

हेही वाचा: महाराष्ट्राचे राज्यपाल हे भाजपचे पॉलिटिकल एजंट - संजय राऊत

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी पंजशीरमध्ये 700 तालिबान्यांचा खात्मा केला असून एक हजार पेक्षा जास्त तालिबानी कैदेत असल्याचा दावा केला होता. तालिबानचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट करत म्हटलेय की, पंजशीरमधील दोन जिल्ह्यांना ताब्यात घेतलं आहे. पंजशीरमधील सातपैकी चार जिल्ह्यांवर कब्जा मिळवला आहे. उर्वरीत भागावर कब्जा मिळवण्यासाठी आगेकूच केली आहे.

हेही वाचा: अनिल देशमुखांना अटक होणार?, ईडीची लूकआऊट नोटीस जारी

अहमद मसूद काय म्हणाला होता...

अहमद मसूद पंजशीरचे दिवंगत नेते अहमद शाह मसूद यांचा मुलगा आहे. पंजशीरमध्ये अहमद शाह मसूद यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाच्या नेतृत्वाखालीच तालिबान विरोधात ही लढाई सुरु आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह सुद्धा पंजशीर खोऱ्यामध्येच तळ ठोकून आहेत. ते आणि अहमद मसूद मिळून ही लढाई लढत आहेत. अमरुल्लाह सालेह देश सोडून पळाल्याचे वृत्त आले होते. पण आपण इथेच असून कमांडर्ससोबत बैठक करत असल्याचं सालेह यांनी सांगितलं.

आम्ही आमची लढाई सोडणार नाही, असं अहमद मसूदने सांगितलय. "आम्ही थकणार नाही आणि हारही मानणार नाही. कुठल्याही धोक्याला आम्ही घाबरत नाही" असे नॅशनल रेसिस्टन्स फोर्सचा कमांडर अहमद मसूद म्हणाला.

loading image
go to top