esakal | अनिल देशमुखांना अटक होणार?, ईडीची लूकआऊट नोटीस जारी
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल देशमुखांना अटक होणार?, ईडीची लूकआऊट नोटीस जारी

अनिल देशमुखांना अटक होणार?, ईडीची लूकआऊट नोटीस जारी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही हजर न राहिल्यामुळे ईडीने लूकआऊट नोटीस बजावली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यासंदर्भात ट्विट केले आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीने त्यांच्या घरावर छापेमारीही केली. ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावला आहे. मात्र, अनिल देशमुख चौकशीसाठी एकदाही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत. परिणाणी ईडीने त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस काढली आहे. त्यामुळे राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना खरंच अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

हेही वाचा: महाराष्ट्राचे राज्यपाल हे भाजपचे पॉलिटिकल एजंट - संजय राऊत

आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये यासाठी अनिल देशमुख यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली. त्यातच आता लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. लूकआऊट नोटीसमुळे अनिल देशमुख यांना देशाबाहेर पळ काढता येणार नाही. देशातील सर्व विमानतळावर अनिल देशमुखांविरेधात नोटीस गेली असेल. या नोटीसमुळे ईडीला अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत.

हेही वाचा: अनिल परबांच्या अडचणीत वाढ, खरमाटेंना ईडीची नोटीस

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यलय, घर आणि इतर संपत्तीवर आतापर्यंत ईडीने 10 ते 12 वेळा छापे टाकले आहेत. सध्या ईडीची तीन पथके एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात देशमुख यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. आता लूकआऊटमुळे लवकरच परराज्यातदेखील ईडीकडून शोध सुरु होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप पत्रात करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला.

loading image
go to top