पापूआ न्यू गिनीला भूकंपाचा धक्का; 20 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे येथील रस्त्यांचा संपर्क तुटला असून, अनेक इमारतींना तडे गेले आहेत. पोलिस उपायुक्त यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, की हेला, इंनगा आणि सदर्न हाइलॅंडस या प्रांतात सेवापूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत

पोर्ट मोरेस्बी - पापूआ न्यू गिनी येथे सोमवारी आलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍याने किमान 20 जण मृत्युमुखी पडले. रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 7.5 इतकी होती.

या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे येथील रस्त्यांचा संपर्क तुटला असून, अनेक इमारतींना तडे गेले आहेत. पोलिस उपायुक्त यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, की हेला, इंनगा आणि सदर्न हाइलॅंडस या प्रांतात सेवापूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

पोलिस उपायुक्त ऍन्डू म्हणाले, की हेला, इंनगा आणि सदर्न हाइलॅंडस या तीन प्रांतात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. सोमवारी सकाळी पापूआ न्यू गिनीच्या मध्य भागात भूकंपाचा धक्का बसला, असे अमेरिकेच्या भूगर्भीय विभागाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: papua new guinea earthquake