अधिकाऱ्यांची हकालपट्टी, नोकरभरती थांबवली; Twitterचा मोठा निर्णय

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी या अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
Elon Musk Twitter Announcement
Elon Musk Twitter Announcement sakal

एलॉन मस्कने काही दिवसांपूर्वीच ट्विटरचा ताबा घेण्याची घोषणा केली. त्यानंतर अनेक अधिकारी ट्विटर सोडून जाणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. मात्र याच चर्चा आता खऱ्या होताना दिसत आहेत. एलॉन मस्कची(Elon Musk Buys Twitter) ट्विटर खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण होते न होते, तोच ट्विटरचे अनेक उच्चस्तरीय अधिकारी कंपनी सोडून जाताना दिसत आहेत.

ट्विटरचे कन्झ्युमर प्रोडक्ट विभागाचे जनरल मॅनेजर केवोन बेकपॉर आणि रेव्हेन्यू विभागाचे जनरल मॅनेजर ब्रूस फाल्क यांनी आपण कंपनी सोडत असल्याची घोषणार केली आहे. बेकपॉर यांनी ट्विटरवरूनच आपण सात वर्षे काम केल्यानंतर ही कंपनी सोडत असल्याची घोषणा केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (Parag Agrawal, CEO of Twitter) यांनीच आपल्याला कंपनी सोडण्यास सांगितल्याचा दावा बेकपॉर यांनी केला आहे.

Elon Musk Twitter Announcement
एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर पराग अग्रवाल चिंतेत; म्हणाले...

आपल्या ट्विटमध्ये बेकपॉर म्हणतात, खरं म्हणजे अशा पद्धतीने आणि अशावेळी मला ट्विटर सोडावं लागेल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि हा माझा निर्णय नाहीये. पराग यांनी मला सांगितलं की त्यांना त्यांची टीम वेगळ्या दिशेला न्यायची आहे आणि त्यानेच मला कंपनी सोडायला सांगितलं. त्यांनी ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी (Co-founder of Twitter Jack Dorsey) यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल आभारही मानले.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (Parag Agrawal, CEO of Twitter) यांनी एका अधिकृत मेलद्वारे फाल्क आणि बेकपॉर कंपनी सोडत असल्याची घोषणा केली. अग्रवाल यांनी खर्च कमी करण्याची आणि सध्या सर्व नवी नोकरभरती थांबवण्याचीही घोषणा केली. सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com