

Paris Shocked: Three Women, Including Pregnant Victim, Injured in Knife Attack
esakal
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पहाटेच्या सुमारास घडलेल्या चाकूहल्ल्यामुळे खळबळ उडाली. एका चाकूधारी व्यक्तीने रस्त्यावरून जाणाऱ्या तीन महिलांना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश असून, हल्लेखोराने "मी अल्लाहचा सैनिक आहे आणि मला ठार मारण्यासाठी पाठवले आहे," अशी घोषणा केल्याचे समोर आले आहे.