विमान दुर्घटना : ८३ प्रवाशांसह विमान कोसळलं 

वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

गझनी : तालिबानचे वर्चस्व असलेल्या अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतामध्ये सोमवारी दुपारी प्रवासी विमान कोसळले. विमानात एकूण ८३ प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गझनी प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते अरीफ नुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजून १० मिनिटांनी हे विमान कोसळले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गझनी प्रांतातील देह याक जिल्ह्यातील सादो खेल भागात हा अपघात झाला आहे. विमान कशामुळे कोसळले ते ही अजून स्पष्ट झालेले नाही. गझनी प्रांताच्या दोन अधिकाऱ्यांनी विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गझनी प्रांताचा हा भाग डोंगराळ असून, हिवाळयात इथे प्रचंड थंडावा असतो. अफगाणिस्तानातील एरियाना कंपनीच्या मालकीचे हे विमान होते. 

पंतप्रधानांचं हास्य घायाळ करणारं; महिला मंत्री पंतप्रधानांवर फिदा

एरियाना कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर विमान कोसळल्याचे वृत्त फेटाळले आहे. आमची सर्व विमाने सुस्थितीत आणि सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एरियाना अफगाणिस्तान एअरलाईन्सने कोसळलेलं विमान आपलं नसल्याचं म्हटलं आहे. एरियाना एअरलाईन्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. एरियाना अफगाणिस्तान एअरलाईन्सची सर्व विमाने सुरक्षित आहेत, कोणत्याही विमानाला अपघात झालेला नाही. माध्यमातून एरियाना अफगाणिस्तानबाबत येणारं वृत्त चुकीचं आहे, असं एरियाना अफगाणिस्तानने म्हटलं आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passenger aircraft has crashed in Ghazni province Afghanistan