विमान समुद्रात कोसळले ; प्रवाशांनी पोहत वाचवला जीव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

सुदूर : लँडिंगदरम्यान पॅसिफिक समुद्रात विमान कोसळले. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांनी पोहत आपला जीव वाचवला. निऊगिनी बोईंग 737-800 या विमानात ही दुर्घटना घडली.

न्यूझिलँडच्या सुदूर माइक्रोनेशियन द्वीपात हे विमान कोसळले. निऊगिनी बोईंग 737-800 हे विमान मायक्रोनेशियन वेनो विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यादरम्यान ते विमान कोसळले. ही घटना सकाळी घडली. हे विमान कोसळल्यानंतर स्थानिकांनी तातडीने विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी छोट्या बोटीची मदत घेतली.

याबाबत विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की या वर्षी सुरवातीला आणखी एक विमान अपघात झाला होता. त्यानंतर हा अपघात झाला. या विमान अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. हा विमान अपघात सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers swim for their lives after plane misses runway crash lands in Pacific lagoon