esakal | पेगॅसस प्रकरणी संयुक्त राष्ट्राची एन्ट्री; सरकारला सुनावलं
sakal

बोलून बातमी शोधा

United Nations

पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा वापर करुन जगभरातील नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे भारतात राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

पेगॅसस प्रकरणी संयुक्त राष्ट्राची एन्ट्री; सरकारला सुनावलं

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा वापर करुन जगभरातील नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे भारतात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भारतातील अनेक पत्रकार आणि राजकीय नेत्यांविरोधात हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने प्रतिक्रिया दिली असून हे प्रकरण अंत्यत चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. तसेच सरकारांनी अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाच्या वापरावर रोख लावावी, कारण यामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं म्हटलं आहे. (Pegasus spyware india united nations said worry to listen stop use of technology)

मानवाधिकाराची चिंता

संयुक्त राष्ट्रने म्हटलंय की, 'जागतिक मीडिया संघाने एक तपास केलाय. यामध्ये इस्त्रायलची कंपनी एनएसओ ग्रुपच्या सॉफ्टवेअरचा वापर करुन जगभरातील पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची हेरगिरी करण्यात आली आहे. मानवाधिकासाठी हे चिंताजनक आहे.' संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बिचलेट म्हणाल्या की, विविध देशांमध्ये पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांच्यावर पेगॅसस स्पायवेअरच्या मदतीने हेरगिरी करण्यात आल्याचा खुलासा चिंताजनक आहे. सरकारांनी असल्या तंत्रज्ञानाचा वापर तत्काळ थांबवावा. शिवाय याला रोखण्यासाठी ठोस कारवाई करायला हवी.

हेही वाचा: पॉर्न फिल्म रॅकेट: राज कुंद्राने बनवला H accounts नावाचा WhatsApp ग्रुप; वाचा सविस्तर

एनएसओ कंपनीचा खुलासा

जगभरातील सार्वभौम देशांना पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा पुरवठा करणाऱ्या एनएसओ कंपनीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. एनएसओने हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचं म्हटलं आहे. तसेच या तंत्रज्ञानाचा केवळ सार्वभौम सरकारांना करण्यात येतो, खासगी कंपन्यांना हे तत्रज्ञान दिलं नसल्याचं कंपनीने म्हटलंय. भारताला या तंत्रज्ञानाचा पुरवठा केलाय का? यावर उत्तर देताना एनएसओने म्हटले की, आम्ही कोणत्याही ग्राहकाची माहिती देत नाही. आमचे ग्राहक गुप्त ठेवले जातात. आम्ही कधीही या प्रणालाची दुरुपयोग केला नाही.

हेही वाचा: विठ्ठला कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे; मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

एनएसओ ग्रुपने सांगितलं की, सॉफ्टवेअरचा वापर कधीही फोनमधील संवाद ऐकण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी केला जात नाही. काही मोजक्या देशांना हे तंत्रज्ञान दिले आहे. देशाची सुरक्षा या कारणासाठी सरकारच्या अधिकृत एजेन्सीला हे तंत्रज्ञान दिलं जातं. दहशतवादी आणि गुन्हे रोखण्यासाठी याचा वापर होता. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आतापर्यंत हजारो जीव वाचवण्यात यश आलं आहे.

loading image