esakal | पॉर्न फिल्म रॅकेट: राज कुंद्राने बनवला H accounts नावाचा WhatsApp ग्रुप; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

पॉर्न फिल्म रॅकेट: राज कुंद्राने बनवला H accounts नावाचा WhatsApp ग्रुप; वाचा सविस्तर

पॉर्न फिल्म रॅकेट: राज कुंद्राने बनवला H accounts नावाचा WhatsApp ग्रुप; वाचा सविस्तर

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्राला (Raj kundra) पॉर्न फिल्म्स (porn films) तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राज कुंद्रा हा या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप आहे. या पॉर्न फिल्म्स प्रकरणात राज कुंद्रासह नेरूळमधून आणखी एकाला अटक केली आहे. (shilpa shetty husbund Raj kundra arrested in porn film racket case what is raj created h accounts whats app group dmp82)

रायन जॉर्न थाँर्प असे या आरोपीचे नाव असून तो नेरूळचा राहणारा आहे. दरम्यान या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आलीय. राज कुंद्राने या सर्व रॅकेटचा व्यवहार करण्यासाठी एक H accounts या नावाने 5 जणांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवला होता.

हेही वाचा: "त्यात काय मोठा पराक्रम?"; राणेंचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल

या ग्रुपमध्ये राज कुंद्रा, मेघा विहान अकाऊन्टट, प्रदीप बक्षी, रॉय डिजिटल मार्केटिंग अकाऊन्ट, आणि रॉय इवेन्ट कन्टेट हेड या पाच जणांचा समावेश होता. या चॅटमध्ये या व्हिडिओतून कमावलेल्या पैशांचीही आकडा समोर आला आहे.

त्यात टोटल आँर्डर 1433

टोटल काँईन्स 3 लाख 32 हजार 483

टोटल सेल 4 लाख 40 हजार 363

एमटीडीसी सेल 27 लाख 81 हजार 551

असा हिशोब मांडण्यात आला असून कुंद्राचे हेच चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत.

हेही वाचा: "हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री तुझ्या भेटीला आले तसेच..."

loading image