esakal | प्रेमात धोका...बदला घेण्यासाठी तिने Ex बॉयफ्रेंडची गाडी घेतली अन् 49 वेळा ....
sakal

बोलून बातमी शोधा

बदला घेण्यासाठी Ex बॉयफ्रेंडची गाडी घेतली अन् 49 वेळा....

बदला घेण्यासाठी Ex बॉयफ्रेंडची गाडी घेतली अन् 49 वेळा....

sakal_logo
By
नामदेव कुंभार

एखाद्याला प्रेमात धोका मिळाल्यानंतर बदला घेण्यासाठी कधी कोण काय करेल हे सांगूच शकत नाही. भावनेच्या ओघात मारहाण , चोरी, खून किंवा काहीही करतात. अशीच एक धक्कादायक घटना चीनमध्ये उघडकीस आली आहे. एका मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने प्रेमात धोका दिला. हे ज्यावेळी तिला समजलं तेव्हा दोघांचं ब्रेक अप झालं. पण बदला घेण्यासाठी मुलीने हद्दच केली.

प्रेमात धोका मिळाल्यामुळे सूडाच्या भावनेनं त्या मुलीनं एक्स बॉयफ्रेंडच्या गाडीने शहरातील एक दोन नव्हे तब्बल 49 ट्रॅफिक सिग्नल तोडले. या गोष्टीमुळे मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडलाही मनस्तापही सहन करावा लागला. त्याच्यावर तुरुंगवारीची वेळही त्याच्यावर आली होती.

हेही वाचा: वाढदिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

रिपोर्ट्सनुसार, चीनमधील शाओक्सिंग (Shaoxing) या शहरात ही घटना घडली असून त्या मुलीचं नाव लू असं आहे. लू हिने बदला घेण्यासाठी एक्स बॉयफ्रेंड चेन याच्या ऑडी कारने 49 वेळा सिग्नल तोडला. लू हिच्या नवीन बॉयफ्रेंडनं बदला घेण्यासाठी मदत केली. जर मदत केली तरच तुझ्याबरोबर डेटला येईल अशी अट लू हिने नवीन बॉयफ्रेंडसमोर ठेवली होती. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी लू आणि तिचा सध्याचा प्रियकर या दोघांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

loading image