Israel-Hamas War: इस्राइलकडून आतापर्यंत 25,000 महिला अन् मुलांची हत्या; पेंटागॉनच्या प्रमुखांनी दिली धक्कादायक माहिती

Israel-Hamas war in Gaza, death toll tops 30,000: हमास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी इस्राइलवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून इस्राइलने आतापर्यंत 25,000 हून अधिक पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची हत्या केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarEsakal

Israel-Hamas War: हमास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी इस्राइलवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून इस्राइलने आतापर्यंत 25,000 हून अधिक पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची हत्या केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

इस्राइलचा खास मित्र असलेल्या अमेरिकेने मोठी कबुली दिली आहे. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर इस्राइलने 25 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींना मारले आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, हमास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी इस्राइलवर हल्ला केला होता. बदला म्हणून, इस्राइलने आतापर्यंत 25,000 हून अधिक पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची हत्या केली आहे.

सदन सशस्त्र सेवा समितीच्या सुनावणीदरम्यान मारल्या गेलेल्या महिला आणि मुलांच्या संख्येबद्दल विचारले असता, ऑस्टिनने खासदारांना सांगितले, "मृतांची संख्या ही 25,000 पेक्षा जास्त आहे" ऑक्टोबरमध्ये हमासच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्राइलला जोरदार पाठिंबा दिला आहे. या हल्ल्यात सुमारे 1,160 लोक मारले गेले आहेत.

Israel-Hamas War
Bangladesh Fire : बांगलादेशात 7 मजली इमारतीला भीषण आग; 44 नागरिकांचा होरपळून मृत्यू, 22 जण जखमी

7 ऑक्टोबरपासून इस्राइलने गाझावर बॉम्बफेक केल्याने जवळपास संपूर्ण शहर जमीनदोस्त झाले आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 30,000 हून अधिक लोक मरण पावले आहेत. दरम्यान, अमेरिका गाझामध्ये युद्धविराम आणि नागरी मृत्यू कमी करण्यासाठी दबाव आणत आहे.

गाझामधील निष्पाप लोकांवरील इस्रायली सैन्याची क्रूरता कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचा आरोप पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. लोक अन्न घेण्यासाठी रांगेत उभे होते. यादरम्यान इस्रायली सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 104 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Israel-Hamas War
Indians Trapped In Russia: नोकरीच्या बहाण्याने बोलावलं अन् युद्धाचं काम दिलं, 20 भारतीय अजूनही रशियात; केंद्र सरकार काय कारवाई करणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com