पेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जानेवारी 2019

नवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नुयी यांच्यासह 'ओव्हरसीज प्राव्हेट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन'चे (ओपिक) अध्यक्ष रे वॉशबर्न आणि ट्रेझरी विभागाचे अधिकारी डेव्हिड मालपास या दोघांची नावेही चर्चेत आहेत.

जागतिक बँकेच्या विद्यमान अध्यक्ष जिम याँग किम यांच्या पदाचा कार्यकाळ येत्या एक फेब्रुवारीला संपत होत आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांनी जागतिक बँकेच्या नव्या अध्यक्षाचा शोध सुरू केला आहे. त्यानंतर या तिघांच्या नावांची चर्चा सुरू झाली. इंद्रा नुयी यांनी ऑक्टोबरमध्ये पेप्सिकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मालपास हे परराष्ट्र मंत्रालयात ट्रेझरीचे अंडर सेक्रटरी आहेत. तर वॉशबर्न ऑगस्ट 2017 पासून ओपिकचे अध्यक्ष आहेत. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत या तिघांची नावे सध्या आघाडीवर आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PepsiCos Nooyi is now World Bank Presidential Race