Queropalca Mayor News
esakal
दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशातील एका छोट्याशा गावातील निवडणुकीचा निकाल सध्या जगभर चर्चेचा विषय ठरला आहे. यामागचं कारणही तितकंच खास आहे. हिटलर मुसोलिनी सिमिओन फ्लोरेस असं नाव असलेल्या एका व्यक्तीने नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांच्या नावामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून, सोशल मीडियापासून आंतरराष्ट्रीय माध्यमांपर्यंत या निकालाची चर्चा रंगली आहे.