esakal | आता अवघड! माणसांनंतर आता प्राणीही सापडले कोरोनाच्या विळख्यात
sakal

बोलून बातमी शोधा

dog

मनुष्यांतून प्राण्यांमध्ये वेगाने पसरत असल्याची ही घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. सध्या या कुत्र्याला निगराणीखाली ठेवण्यात आले असून, कोरोनाची तिव्रता भीषण नाही. पॉमेरनियन जातीचा हा कुत्रा असून, गेल्या शुक्रवारी त्याला कोरोनाची लागण झाली की नाही याबाबतचे नमुने तपासणीसाठी दिले होते.

आता अवघड! माणसांनंतर आता प्राणीही सापडले कोरोनाच्या विळख्यात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हाँगकाँग : मनुष्यांमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसपासून आता प्राणीही वाचू शकलेले नाहीत. हाँगकाँगमध्ये एका पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागणी झाली असून, त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

मनुष्यांतून प्राण्यांमध्ये वेगाने पसरत असल्याची ही घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. सध्या या कुत्र्याला निगराणीखाली ठेवण्यात आले असून, कोरोनाची तिव्रता भीषण नाही. पॉमेरनियन जातीचा हा कुत्रा असून, गेल्या शुक्रवारी त्याला कोरोनाची लागण झाली की नाही याबाबतचे नमुने तपासणीसाठी दिले होते. या कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या 60 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांच्यावर 25 फेब्रुवारीपासून उपचार सुरु आहेत.

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारचे आपत्कालीन नियोजन

साउथ चायना मॉर्निंग पोस्ट यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. मात्र, त्याची तिव्रता कमी आहे. मनुष्यातून प्राण्यात रोगाचा प्रसार झाल्याची ही पहिलीच घटना आहे. हाँगकाँग सरकार, विद्यापीठाने याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे. हाँगकाँगमध्ये सोमवारी 100 हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 

loading image