esakal | कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारचे आपत्कालीन नियोजन
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Care

दिल्लीतील रुग्णालयांत सुविधा
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दिल्लीत २५ सरकारी रुग्णालयांतील २३० बेड संशयितांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. १२ ठिकाणी रक्ताच्या तपासणीच्या सुविधा आहेत, तर साडेतीन लाख मास्कही तयार ठेवण्यात आले आहेत. देशातील राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहारसह विविध राज्यांत तातडीने ३४ प्रयोगशाळा उघडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते, त्यातील तीन जण बरे झाल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.  दिल्लीतील आयटीबीपीच्या छावणीत भरती केलेल्या इटलीच्या २१ पैकी १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मयूरविहारमधील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना वेगळे ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारचे आपत्कालीन नियोजन

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने आपत्कालीन उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज उच्चस्तरीय दीर्घ बैठका घेऊन कोरोनाच्या लढाईसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दिल्लीसह देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २९ पर्यंत, तर संशयित रुग्णांची संख्या ४०० च्या आसपास पोचल्याचे सांगण्यात येते. दिल्ली मेट्रो व मनुष्यबळ विकास मंत्रालयासह विविध मंत्रालयांनीही आपापल्या शिक्षणसंस्था व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शिका जारी करून कोरोनापासून घ्यायच्या विशेष खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी दुसरी बैठक घेतली. त्यात दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाचा फैलाव वाढल्यास एम्समध्ये कक्ष उघडण्यात येणार आहे. सध्या २५ संशयितांना सफदरजंग रुग्णालयात तर चौघांना लोहिया रुग्णालयात वेग-वेगळ्या वॉर्डात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 

Coronavirus : भारतात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण; रुग्णांची संख्या...

राजस्थानात सर्वाधिक भीती 
इटलीचा कोरोनाग्रस्त रुग्ण जयपूरमध्ये आढळला व त्याच्याबरोबर भारतात आलेल्या १६ पर्यटकांना व त्यांच्या वाहनाच्या भारतीय चालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. इटलीच्या २६ जणांचा हा जत्था भारतभेटीवर आला होता.  या साऱ्यांनाच वेगळे ठेवण्यात आले आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे हे इटलीचे पर्यटक जयपूर, उदयपूर व झुनझुनूसह राजस्थानच्या ६ जिल्ह्यांत ८ दिवस फिरत होते. त्यांच्या संपर्कात शेकडो लोक आले आहेत. त्यापैकी २१५ लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. ज्या हॉटेलांत ते थांबले होते त्यांच्या खोल्या सील करण्यात आल्या असून, हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही राजस्थान सरकारतर्फे वेगळ्या कक्षात दाखल करण्यात आले आहे.

मोदींनी घेतला मोठा निर्णय; यंदा होळीच्या कार्यक्रमात...

जागतिक बॅंकेची १२ अब्ज डॉलरची मदत
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी जागतिक बॅंकेने १२ अब्ज डॉलरची मदत जाहीर केली आहे. प्रामुख्याने जगातील गरीब राष्ट्रांना ही मदत मिळेल. या निधीचा उपयोग वैद्यकीय उपकरणे किंवा आरोग्य सेवांसाठी करता येणार आहे.

कोरोना संसर्गाला तोंड देण्यासाठी जलद आणि प्रभावी कृती करण्यासाठी या निधीचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जागतिक बॅंकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी म्हटले आहे. अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या गरीब देशांना कोरोनाचा सामना करताना अतिरिक्त आर्थिक ताण येणार आहे.

कोरोना भारतात येऊ दे रे देवा; अभिनेत्याची प्रार्थना 

loading image
go to top