esakal | Vaccination: युरोपमध्ये फायजरच्या बूस्टर डोसला मंजूरी
sakal

बोलून बातमी शोधा

pfizer vaccine

युरोपमध्ये फायजरच्या बूस्टर डोसला मंजूरी

sakal_logo
By
सुधीर काकडे

युरोपियन युनियनच्या औषध प्रशासनाने सोमवारी फायजर/बायोटेक कोविड लसीच्या बूस्टर डोसला १८ वर्षांवरील लोकांसाठी मंजूरी दिली. सुरूवातीच्या डोसनंतरही लसीची कार्यक्षमता कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अॅम्स्टरडॅममध्ये असेलेल्या युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) ने रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांसाठी मॉडर्ना आणि फायझर लसींचा अतिरिक्त डोस देखील मंजूर केला आहे.

दुसऱ्या डोसच्या किमान सहा महिन्यांनंतर 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांसाठी कॉमिर्नाटी बूस्टर डोसचा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती इएमएकडून देण्यात आली आहे.

loading image
go to top