esakal | जगातली महागडी लस भारताला मिळणार स्वस्तात; अमेरिकन कंपनीकडून सरकारला ऑफर

बोलून बातमी शोधा

Pfizer Corona vaccine
जगातली महागडी लस भारताला मिळणार स्वस्तात; अमेरिकन कंपनीकडून सरकारला ऑफर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन : अमेरिकेतील फार्मास्यूटीकल कंपनी फायझर 'not-for-profit' अर्थात 'ना नफा' दराने भारताला कोरोनाची लस देणार आहे, अशी ऑफर कंपनीने भारताला दिली असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी आज गुरुवारी दिली आहे. भारतासाठी फायझरने त्यांची लस सरकारी लशीकरण कार्यक्रमासाठी 'ना-नफा' तत्वावर देण्याची ऑफर दिली आहे. आम्ही सरकारशी चर्चा करत आहोत आणि आमची लस भारतातील लशीकरण मोहिमेत येण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कंपनीच्या प्रवक्त्यांनी या अमेरिकन लशीच्या किंमतींबद्दलचा आधीचा एक रिपोर्ट फेटाळून लावण्यासाठी हे निवेदन जारी केलं आहे. कंपनीने म्हटलंय की, आम्ही जगभरातील वेगवेगळ्या उत्पन्नगटातील देशांसाठी वेगवेगळी किंमत असणारी पद्धत स्विकारली आहे. जगभरातील सद्यपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, फायझरने म्हटलंय की, ते लशीकरण कार्यक्रमांसाठी सरकारांना लस पुरवून मदत करत आहेत आणि हे ते आवश्यक समजतात.

हेही वाचा: दुसऱ्या लाटेचा धसका: तासन्‌तास उभे राहूनही मिळेना लस

देशातील लशीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी गेल्याच आठवड्यात भारताने मॉडर्ना, फायझर आणि जॉनसन एँड जॉनसन यांनी विकसित केलेल्या विदेशी बनावटीच्या लशींसाठी मार्ग मोकळा केला आहे. या तीनही लशी आपत्कालीन वापरासाठी म्हणून मंजुरी मिळवण्यासाठी सध्या सरकारबरोबर चर्चेत असल्याची माहिती आहे. फायझरची लशीचा एक डोस सध्या अमेरिकन सरकारला प्रत्येकी 19.5 डॉलरला मिळतो. तर युरोपियन देशांसाठी अलिकडेच फायझरने आपल्या डोसची किंमत वाढवून ती 15.5 युरोवरुन 19.5 युरोवर आणली आहे.