दिलासादायक: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही फायझर लस पुरुन उरणार; नव्या संशोधनात दावा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

असं म्हटलं जातंय की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये 17 बदल झाले आहेत.

नवी दिल्ली : कोरोनावरील लस आणि  ब्रिटनमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आता एक दिलासादायक बातमी आली आहे. कोरोनाची लस बनवणाऱ्या फायझर कंपनीने दावा केलाय की त्यांची लस ब्रिटन आणि दक्षिण अफ्रिकेत सापडलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनवर देखील परिणामकारक आहे. 

टेक्सास मेडिकल ब्रँचच्या संशोधकांचं म्हणणं आहे की कोरोनावरील लस या खतरनाक व्हायरसला नेस्तनाबूत करण्यास प्रभावी आहे. हा नवा स्ट्रेन कोरोनाच्या नेहमीच्या व्हायरसहून अधिक संसर्गजन्य आहे. मात्र, यावर आता फायझरची लस प्रभावी असल्याचे संशोधन संशोधकांनी केलं आहे. 

हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 234 रुग्णांचा मृत्यू; राज्यात आज लसीकरणाची ड्राय रन

लस दिल्या गेलेल्या लोकांच्या रक्ताचे परिक्षण केले गेले आणि त्याआधारेच हा दावा केला गेलाय. रिपोर्टमध्ये म्हटलंय की, या संशोधनाचे निष्कर्ष सिमित आहेत कारण हे गतीने पसरणाऱ्या नव्या व्हायरसच्या नव्या व्हेरिंयटमध्ये मिळालेल्या म्यूटेशनवर लक्ष देत नाही.

असं म्हटलं जातंय की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये 17 बदल झाले आहेत. या स्ट्रेनमधील आठ रुप जीनमध्ये प्रोटीन वाढवणारे आहेत ज्यातील दोन खूपच धोकादायक आहेत, त्यामुळे हा व्हायरस सर्वाधिक अपायकारक मानला जात आहे. नव्या स्ट्रेनच्या N501Y रुपमुळे शरिरातील सेल्सवर हल्ला चढवला जातो तर H69/V70 रुपामुळे शरिराच्या प्रतिकारशक्तीला कमकुवत केलं जातं.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pfizer says its coronavirus vaccine effective against new strain found in britain