

दक्षिण फिलीपिन्समध्ये सोमवारी घडलेल्या एका घटनेने काही वर्षांपूर्वीच्या टायटॅनिक जहाजाच्या वेदनादायक आठवणींना उजाळा दिला आहे. मध्यरात्रीनंतर ३५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज अचानक बुडाले. बचावकर्त्यांनी आतापर्यंत किमान १८ मृतदेह बाहेर काढले आहेत. अंदाजे ३१६ प्रवाशांना वाचवण्यात आले आहे, तर अनेक जण बेपत्ता आहेत.